उद्घाटनापूर्वी अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलले!

28 Dec 2023 12:03:06
ayodhyadham 2
 
लखनौ : अयोध्येत श्रीराममंदीराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. भारतभर त्यामुळे उत्साहाच वातावरण आहे. अयोध्येतील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्याधाम असे करण्यात आले आहे. अयोध्येमध्ये आधुनिक सुविधांनी सज्ज अशा रेल्वे स्थानकाचे काम पुर्ण झाले आहे. काही दिवसांपुर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी अयोध्या जंक्क्षन चे नाव अयोध्याधाम जंक्शन करावे अशी इच्छा व्यक्त केली होती.
 
ayodhyadham 1
 
रेल्वे विभागाने बुधवारी रात्री अयोध्या जंक्शन चे नाव अयोध्याधाम जंक्क्षन करण्यास मंजुरी दिली. या रेल्वे जंक्क्षनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ३० डिसेंबर ला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरूनच वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. अयोध्येमध्ये श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही लवकरच लोकार्पण होणार आहे.
 
ayodhyadham 
 
कसे आहे अयोध्याधाम स्थानक
अयोध्याधाम रेल्वे स्थानक श्रीराममंदीरापासुन साधारण १ कीलोमीटर दुर आहे. हे स्थानक आधुनिक सुविधांनी परीपुर्ण असणार आहे. त्रेतायुग दर्शवणारी सजावट ही येथे करण्यात येणार आहे. साधारण ५० हजार प्रवाशांची क्षमता असलेल्या या स्थानकाचे ३० डिसेंबरला लोकार्पण होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0