लखनौ : अयोध्येत बनत असलेल्या श्रीराममंदीरासाठी लखनौ येथील एका भाजीविक्रेत्याने पेटंट वर्ल्ड क्लॉक भेट म्हणुन दिले आहे. ही अनोखी भेटवस्तू भाजी विक्रेते अनिल कुमार साहू यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केली. अनिल कुमार साहू यांनी दिलेले घड्याळाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे घड्याळ एकाच वेळी अनेक देशांची वेळ सांगते. ज्यामध्ये भारत, मेक्सिको,जपान, दुबई,टोकियो, मेक्सिको सिटी, वॉशिंग्टन या देशांचा समावेश आहे.
श्रीराम मंदीराच्या उद्घाटनासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीराममंदीर उभारण्यासाठीचा निधीही जनतेतुनच जमा करण्यात आला होता. आताही सर्वजण उत्साहाने आपापल्यापरीने राम मंदिरासाठी काहीना काही करत आहेत. २२ जानेवारीला अयोध्येत रामल्लांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व २५ जानेवारीपासुन मंदीर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधांन नरेंद्र मोदी उपस्थीत राहणार आहेत. त्याचबरोबर देशभरातुन अनेक मान्यवर ही उपस्थीत राहणार आहेत.