" उद्धव ठाकरेंनी आधी महापौर पदासाठी उभं राहावं!"

26 Dec 2023 17:34:03

Uddhav Thackeray


मुंबई :
उद्धव ठाकरेंनी आधी महापौर पदासाठी उभं राहावं, असा खोचक टोला भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी लगावला आहे. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही जोरदार टीका केली आहे. निलेश राणे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
निलेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंकडे मी बघतच नाही. ते श्रीदेवी आहेत का? त्यांच्यामध्ये बघण्यासारखं काय आहे? ४० किलोचा माणूस आहे. बिचारे आजारी आहेत. अस्तित्त्व कुठे आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयोग सुरु आहे. ते साधे नगरसेवकही टिकवू शकले नाहीत. मोदीजी ३०० खासदार निवडून आणून दाखवतात. त्यांचा आणि टीकेचा काय संबंध आहे. उद्धव ठाकरेंनी समाजात काय काम केले आहे? त्यांनी एकतरी समाजोपयोगी कार्यक्रम कधी केला आहे हे दाखवून द्यावं. ज्यांचं समाजात काही स्थान नाही, ज्यांच्या ग्रामपंचायती आणि नगरसेवक येत नाही अशा लोकांनी मोदींवर टीका करावी का?" असा सवालही त्यांनी केला आहे.
 
"उद्धव ठाकरे आधी मुंबईचे महापौर होतील की नाही ते बघावं. आधी त्या शर्यतीत त्यांना उभं करा. ते पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील हा तर २०२४ चा जोक ऑफ द ईयर आहे. उद्धव ठाकरेंना म्हणावं आधी महापौर पदासाठी उभं राहावं," असा टोला त्यांनी लगावला आहे.
 
संजय राऊतांविषयी बोलताना ते म्हणाले की, "राम मंदिराचा विषय पेटला तेव्हा संजय राऊत कुठे होते? त्याचा काय संबंध आहे? उगाच श्रेय घेण्यासाठी काहीही बोलायचं का? संजय राऊत म्हणजे कोण? ते काहीही म्हणतील. अमेरिकेतील व्हाईट हाऊस आम्हीच बांधलं असेही ते म्हणतील. त्यांच्या बोलण्याला काहीच हातपाय नाही," असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0