लखनऊ : रामनगरी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे काम सुरु आहे. दि.२२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील हजारो मान्यवरांच्या उपस्थित रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर आंदोलनात शहीद झालेल्या रामभक्तांच्या स्मरणार्थ अयोध्येत स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "कोठारी बंधूंची समाजवादी सरकारच्या काळात १९९० मध्ये राम मंदिर आंदोलनात हत्या झाली होती. त्यांच्याबरोबरच अयोध्येत लाखो रामभक्त शहीद झाले. आज अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारले जात असताना त्या सर्व आत्म्यांना शांती लाभेल. त्यांना समाधान वाटेल की, ज्या राम मंदिरासाठी आपण आपल्या प्राणांची आहुती दिली त्या राम मंदिरासाठीचा आपला संकल्प पूर्ण होत आहे. प्रभू रामाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प पूर्ण होत आहे. प्रभू रामाने हा संकल्प पूर्ण केला आहे."
पुढे बोलताना ते म्हणाले की, "राम मंदिर आंदोलनात शहिद झालेल्या रामभक्तांच्या स्मरणार्थ अयोध्येत स्मारक बांधण्यात येणार आहे." आम्ही तुम्हाला सांगतो की, राम मंदिर उभारणीसाठी कारसेवा करणाऱ्या रामभक्तांवर १९९० साली मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री असताना पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत राम कोठारी आणि शरद कोठारी या दोन भावांची हत्या झाली होती.