गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! EV क्षेत्रातील पहिला IPO येणार!

25 Dec 2023 16:23:28
 Ola_Electric
 
मुंबई : इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी ओला इलेक्ट्रिकने शुक्रवारी बाजार नियामक सेबीकडे आयपीओद्वारे पैसे उभारण्यासाठी प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत. ओला इलेक्ट्रिक ही आयपीओ आणणारी पहिली इलेक्ट्रिक वाहन कंपनी बनली आहे. मागच्या काही काळापासून ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओची चर्चा सुरु होती.
 
कंपनीने सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्र जमा केली असली तरी, अद्याप शेअर्सची किंमत आणि तारखेबाबत माहिती मिळू शकलेली नाही. सेबीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, कंपनी आयपीओद्वारे ५,५०० कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. आयपीओमधून उभारलेला निधी ओला गिगाफॅक्टरी प्रकल्पासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
 
Powered By Sangraha 9.0