मोहम्मद साहिलने अल्पवयीन मुलीचे केले अपहरण! नीरज कुमार यांचा पोलिसांना अल्टिमेटम

25 Dec 2023 18:25:43
 
Mohammad Sahil
 
 
नवी दिल्ली : मुरलीगंज येथील मोहम्मद कलाम यांचा मुलगा मोहम्मद साहिल याने 20 डिसेंबर 2023 रोजी एका मुलीचे अपहरण केले. तिच्या पालकांनी माधोपूर सदर पोलिस ठाण्यात तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. तिच्या पालकांनी तक्रारीत म्हटले आहे की, मुलगी 20 डिसेंबर रोजी महाविद्यालयात गेली आणि दुपारी 4 वाजताच्या सुमारास बेपत्ता झाली. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती त्यांना सापडली नाही.
 
बिहार बुलेटिनशी बोलताना तिच्या आईने सांगितले की, मुलीने फोनवर सांगितले की ती परत येणार नाही. तिच्या भावाने सांगितले की, त्यांनी तिचा फोन अनेक वेळा लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिडीतेने मी परत येणार नाही. माझं लग्न झालं असल्याचे सांगितले. तिने रडतच कॉल डिस्कनेक्ट केला. तेव्हापासून तिचा संपर्क झालेला नाही. बेपत्ता झालेल्या मुलीच्या शेजारी साहिलचे आजी-आजोबा राहतात. फिर्यादीत मोहम्मद अफरोज, मोहम्मद फिरोज आणि इतर कुटुंबीयांची नावे आहेत.
 
घटनेची माहिती मिळताच भाजप नेते नीरज कुमार भान टेकडी येथे पोहोचले. हे लव्ह जिहादचे स्पष्ट प्रकरण असून, प्रशासनाला दोन दिवसांत मुलीचा शोध न लागल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. माधोपूरचे पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी एका निवेदनात सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून रात्रीपर्यंत मुलीला परत मिळवून देतील.
 
 
Powered By Sangraha 9.0