लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये रसुद्दीन नावाच्या तरुणाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर बलात्कारामुळे मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याबरोबरच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (२३ डिसेंबर २०२३) मुरादाबादच्या माझोला पोलीस ठाण्याच्या लोदीपूर गावात राहणारी एक अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत गवत कापण्यासाठी शेतात गेली होती. इथे ती तिच्या मैत्रिणींपासून काही अंतरावर गवत कापत होती.दरम्यान, जवळच्या जवाहर नगर गावातील रहिवासी रसुद्दीन (२५ वर्ष) तेथे आला आणि त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
पीडित अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पीडितेला मुरादाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मुलीच्या कुटुंबीयांनी रसुद्दीनविरुद्ध मुरादाबादमधील माझोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रसुद्दीनविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.