प्रभासच्या ‘सालार’चा शाहरुखच्या ‘डंकी’ला मोठा फटका!

    23-Dec-2023
Total Views |

dunki and saalar 
 
 
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ३० कोटींची कमाई केली असून या वर्षात त्याच्या प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ आणि ‘जवान’च्या तुलनेने ही फार कमी आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता.
 
‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘डंकी’ने दुसऱ्यादिवशी २०.५० कोटींची कमाई केली असून दोन दिवसांची एकूण कमाई ४९.७ कोटी झाली आहे. तर दुसरीकडे अभिनेता प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाने डंकीला मागे टाकत पहिल्या दिवशी ९५ कोटींची कमाई करत इतिहास रचला असून भारतात इतक्या कोटींची कमाई करत आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग सालारने केली आहे. तसेच, याच चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात १७५ कोटी रुपये कमावले आहेत.
 
‘डंकी’ मध्ये शाहरुख खानबरोबरच तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. तर, ‘सालार’ मध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, मीनाक्षी चौधरी, श्रुती हासन, सरण शक्ती, इश्वरी राव, जगपती बाबू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.