मराठा आरक्षणाच्या लढाईचा पहिला टप्पा यशस्वी!

23 Dec 2023 18:09:13

Supreme Court


नवी दिल्ली :
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यातच आता एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधी दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका स्विकारली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणप्रश्नी खुप मोठा दिलासा मिळाला आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने मराठा समाजाला मिळालेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. परंतू, ठाकरे सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण रद्द करण्यात आले. त्यानंतर महायुती सरकारकडून यासंबंधी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईतील हा एक महत्त्वाचा विजय असल्याचे मानले जात आहे.

 
Powered By Sangraha 9.0