गुन्हा करण्यासाठी आलेल्या राशिदचा उत्तर प्रदेशात एनकाऊंटर!

23 Dec 2023 22:45:58
Reward-carrying criminal killed in encounter with UP

लखनौ : उत्तर प्रदेशात गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची सातत्याने मोहीम सुरू आहे. अनेक गुन्हेगार चकमकीत मारले गेले आहेत तर काही जखमी झाले आणि नंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. दरम्यान, बुलंदशहर पोलिसांनी दिल्लीतील एका वाँटेड गुन्हेगाराचा एनकाउंटर केला. राशिदला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली आहे.

बुलंदशहर पोलिसांनी पकडलेल्या दिल्लीतील गुन्हेगाराचे नाव राशिद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर १० हजार रुपयांचे बक्षीसही आहे. वरिष्ठ पत्रकार अनुराग चढ्ढा यांनी दावा केला आहे की,गुन्हेगार राशिदने बुलंदशहरमध्ये अनेक गुन्हे केले असून त्याच्यावर १२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

बुलंदशहर पोलिसांनी सांगितले की, खानपूर पोलिस स्टेशन आणि SWAT देहत टीम २२-२३ डिसेंबर २०२३ च्या रात्री सौझाना झाया गेट येथे संशयास्पद वाहनांचा शोध घेत होती. एका गुप्तचराच्या माहितीवरून ही शोधमोहीम राबविण्यात येत होती. दरम्यान, मोटारसायकलवरून आलेल्या एका व्यक्तीला थांबण्याचा इशारा केला असता त्याने आपली दुचाकी मागे वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.




यावेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो घसरला आणि दुचाकीसह पडला. स्वत:ला पोलिसांनी घेरल्याचे पाहून त्याने पोलिस पथकावर गोळीबार सुरू केला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि या कारवाईत त्याच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी त्याला जखमी अवस्थेत ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दिल्लीचा रासिद उर्फ ​राशिद बनिया असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव असल्याचे बुलंदशहर पोलिसांनी सांगितले आहे. तो दिल्लीतील सीलमपूरचा रहिवासी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर १० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. राशिद नावाच्या या गुन्हेगारावर एकट्या बुलंदशहरमध्ये १० गुन्हे दाखल आहेत.

राशिदवर हे गुन्हे खुर्जापासून खानपूर आणि सिकंदराबाद, छतारीपर्यंतचे आहेत. अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची दुचाकी, ३१५ बोअरचे पिस्तूल आणि दोन काडतुसे (एक रिकामी) जप्त केली. राशिदने ही बाईक अलीगढच्या सासनीगेट पोलिस स्टेशन परिसरातून चोरली होती.


 
Powered By Sangraha 9.0