नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण प्रकरणी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण प्रदान केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणास आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर २०२१ साली सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये हे आरक्षण रद्द केले होते.
त्यानंतर राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या याचिकेवर निर्णय झाल्यास मराठा आरक्षणाविषयी पुढील कार्यवाही ठरणार आहे.