महात्मा फुले आणि सावित्रीमाईंच्या जीवनावर आधारित 'सत्यशोधक' या दिवशी होणार प्रदर्शित

22 Dec 2023 17:43:49

satyashodhak 
 
मुंबई : स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा संपन्न झाला.
 
सत्यशोधक चित्रपटात महात्मा फुले यांनी पत्नी सावित्रिबाई फुले यांच्यासमवेत स्त्री शिक्षणाचा पायंडा कसा समाजात दृढ करत अक अडचणींना सामोरे जात आपले उद्दीष्ट पुर्ण केले हे दाखवण्यात आले आहे. ‘सत्यशोधक’ मध्ये संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडेंसह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी असणार आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0