ठाकरे बंधूंची भेट! काय झाली चर्चा?

22 Dec 2023 14:53:58
raj uddhav
 
मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शुक्रवारी २२ डिसेंबरला एका कार्यक्रमादरम्यान एकत्र आले आहेत. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांनी उधाण आल आहे. याच कार्यक्रमाला रश्मी ठाकरेही उपस्थीत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार मध्ये आल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात झाल्या होत्या. परंतु या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याच ही सांगितल जात आहे.
  
राज ठाकरेंच्या बहीण जयवंती देशपांडे यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी ते एकत्र आले होते. दादर येथील हिंदु कॉलनी मधील एका हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणत्याही प्रकारचा संवाद झाला नसल्याची माहीती तेथे उपस्थीतांकडुन देण्यात आली आहे. या कार्यक्रमात रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची भेट झाली. त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या मातोश्रींसोबत संवाद साधला आणि त्यांची विचारपूसही केली.
 
 
Powered By Sangraha 9.0