पूंछ दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करणार

22 Dec 2023 19:16:12
NIA visits J-K's Poonch encounter site

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारीच गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएने यापूर्वी सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीर कोकरनागमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमक प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. त्यानंतर त्याच पथकाकडे आता पूंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही तपास सोपविण्यात आला आहे.
 
भारतीय लष्कर आणि व्हाईट नाइट कॉर्प्सने गुरुवारी दहशतवाद्यांचा सामना करताना हौतात्म्य आलेल्या जवानांच्या शौर्यास मानवंदना दिला आहे. त्याचप्रमाणे राजौरी सेक्टरमधील डेरा गली येथील जंगल परिसरात संरक्षण दलाकडून शोध मोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी डेरा गली परिसराला वेढा घातला असून सखोल शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

Powered By Sangraha 9.0