'इल्युमिनेट द फ्युचर'ला मुंबईकरांचा उस्फुर्त प्रतिसाद; टाटा पॉवरचा उपक्रम

22 Dec 2023 18:15:13
Illuminate the Future TATA Power Initiative

मुंबई :
शालेय बालकांमध्ये ऊर्जा बचत आणि हरित ऊर्जा वापराबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने सध्या देशभरात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने टाटा पॉवरच्या माध्यमातून "इल्युमिनेट द फ्युचर" या उपक्रमांतर्गत मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांसाठी जागरूकता सत्रे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला मुंबईतील शाळांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती 'टाटा पॉवर'च्यावतीने देण्यात आली.
 
१४ ते २१ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहामध्ये मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करवून घेऊन ऊर्जा संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण केली. या उपक्रमात ७५० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले. पृथ्वी संरक्षणासाठी, ऊर्जा संवर्धन किती मोलाची भूमिका बजावते याची माहिती टाटा पॉवरमधील तज्ञांनी वेगवेगळ्या संवादात्मक सत्रांमध्ये दिली. कार्यशाळा, क्विझ आणि पोस्टर बनवणे स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरकतेविषयी आपली समज अतिशय कल्पकतेने व्यक्त केली. घरी तसेच आजूबाजूच्या भागात ऊर्जा अम्बॅसॅडर बनून काम करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली.
Powered By Sangraha 9.0