नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०२४ च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, फ्रान्स सरकारने मोदी यांना १४ जुलै रोजी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. भारत सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रमुख पाहुणे म्हणुन आमंत्रित केले होते. पण त्यांनी जानेवारीत येण्यास अशक्यता दर्शवली. यामुळे प्रमुख पाहुणे म्हणुन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी फ्रान्स नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची ही सहावी घटना आहे. फ्रान्सचे माजी पंतप्रधान जॅक शिराक हे १९७६ आणि १९९८ मध्ये दोन वेळा उपस्थित होते. माजी राष्ट्राध्यक्ष व्हॅलेरी गिस्कार्ड डी एस्टिंग, निकोलस सार्कोझी आणि फ्रँकोइस ओलांदे यांनी १९८०, २००८, २०१६ मध्ये उपस्थित राहिले होते.