संसद सुरक्षाभंगातील आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ!

21 Dec 2023 17:59:53
Parliament Breach case update

नवी दिल्ली : संसद सुरक्षा भंग प्रकरणातील चारही आरोपींना पतियाळा हाऊस न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढवली आहे. त्याचवेळी संसदेच्या सुरक्षेसाठी आता केंद्रीय औद्योगिक पोलिस दलाकडे (सीआयएसएफ) जबाबदारी देण्यात आली आहे.

संसदेच्या सुरक्षाभंग प्रकरणी न्यायालयाने ४ आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याचे न्यायालयास सांगितले आहे. त्याचप्रमाणे अधिक चौकशीसाठी आरोपी नीलम, मनोरंजन डी, सागर शर्मा आणि अमोल शिंदे या चौघांना तपासासाठी अनेक ठिकाणी नेण्याची गरज असल्याचेही पोलिस म्हणाले. या सर्व आरोपींचा खरा हेतू अद्याप समजू शकलेला नाही, त्यासाठी त्यांच्या समाजमाध्यम खात्यांचाही तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संसदेतील सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्र सरकार संसदेच्या सुरक्षेबाबत गंभीर आहे. संसदेची सुरक्षित सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने आता सीआयएसएफकडे सुरक्षेची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या मंत्रालयांचे रक्षण करणाऱ्या सीआयएसएफच्या गव्हर्नमेंट बिल्डिंग सिक्युरिटी युनिटमधील तज्ञांसह सीआयएसएफ अग्निशमन आणि बचाव अधिकारी आणि सध्याच्या संसदेच्या सुरक्षा पथकातील अधिकारी या आठवड्याच्या अखेरीस सर्वेक्षणाला सुरुवात करणार आहेत.


Powered By Sangraha 9.0