फरिदाबादमध्ये गो तस्करांच्या ताब्यातुन ६ गायींची सुटका! आरोपी फरार

21 Dec 2023 15:22:19
 
Faridabad
 
 
हैदराबाद : हरियाणाच्या फरिदाबादमध्ये गोरक्षक आणि गो तस्करांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीनंतर ६ जिवंत गायी जप्त करण्यात आल्या आहेत. गो तस्करांनी गोरक्षकांवर दगडफेक, गोळीबार केला. या गायींची तस्करीसाठी वाहनातून वाहतूक केली जात होती. या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (20 डिसेंबर 2023) घडली.
 
गोरक्षक 'लिव्ह फॉर नेशन'च्या सदस्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ही घटना लाईव्ह स्ट्रीम केली आहे. सुमारे २ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी दिसत आहे. तस्करीसाठी वापरले जाणारे वाहन चकमकीनंतर जप्त करण्यात आले. वाहनाच्या पिवळ्या प्लेटवर HR 55 AQ 2956 हा क्रमांक दिसतो आहे.
 
 
 
या घटनेची माहिती देताना लिव्ह फॉर नेशन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल कौशिक म्हणाले की, वाहन पकडण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. त्याच्यावर गो तस्करांनी दगडफेक आणि गोळ्या झाडल्या. सोहना रोड येथील धौज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलमपूर येथे हे वाहन पकडण्यात आले. ६ ते ७ तस्कर गाडी सोडून पळून गेले. जप्त केलेल्या गायी गोठ्यात ठेवण्यात आल्या आहेत. गाडीच्या मागील बाजूस ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ असेही लिहीले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0