ड्रग्स विरोधात महायुती सरकारची मोठी कारवाई! उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

20 Dec 2023 19:20:37

Fadanvis


नागपूर :
महायुती सरकारच्या काळात ड्रग्स प्रकरणी २४ हजारांहून अधिक आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. बुधवारी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या सरकारच्या काळात ड्रग्जविरोधात पहिल्यांदाच मोठी कारवाई झाली. २४ हजारांहून अधिक आरोपींच्या मुसक्या आवळल्या. २०२० मध्ये ५ हजार ३२१ आरोपींवर कारवाई केली होती. गेल्या काही दिवसांत १३ हजार १२५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी २३ हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. पोलीस दलाला नवे स्वरूप देत २०११ च्या जनगणनेनुसार सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दोन पोलीस ठाण्यांमधील अंतर आणि सर्व नियम बदलले जातील. सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांत सध्या मोठी वाढ होत आहे. ही बदलती परिस्थिती लक्षात घेता नवीन आकृती बंद तयार केला आहे. एनसीआरबीचा अहवाल बघता, जयंत पाटील आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री होते तरी त्यांनी अहवालाचे निट वाचन केले नाही. एनसीआरबीचा अहवाल कसा वाचावा हे मी त्यांना शिकवतो," असा टेलाही त्यांनी लगावला.



Powered By Sangraha 9.0