"एक नंबर मुख्यमंत्री हा पुढून नव्हे मागून होता!", घरी बसून नं.१ कसा मिळेल?

20 Dec 2023 16:41:43
CM Eknath Shinde In Winter Session

नागपूर :
"रोज आमच्यावर आरोप करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा हिशोब मी व्यवस्थित मांडणार आहे", असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना दिला आहे. पुराव्यासकट सर्वच गोष्टी बाहेर येणार आहेत, असेही ते म्हणाले. कपड्याचे दुकान असलेल्या रोमीन छेडा नावाच्या कंत्राटदाराने गंजलेले ऑक्सिजन प्लांट दिल्याने काळ्या बुरशीचे आजार रुग्णांना झाल्याचे स्वतः डॉक्टरांनीच समोर आणले आहे, असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदेनी केला आहे. लोकांचा जीव गेला मात्र, काहींना त्याचे सोयर सुतक नाही जिथे टेंडर तिथे सरेंडर अशी यांची वृत्ती आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

सर्वसामान्य मुंबईकर जेव्हा कुटूंब वाचविण्यासाठी जेव्हा प्रयत्न करत होते तेव्हा तत्कालीन सरकारच्या काळात 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' म्हणत सर्वच टेंडर माझ्या नातेवाईकांच्या दारी, ही भूमिका तेव्हाच्या सरकाराने घेतली आणि जनतेला वाऱ्यावर सोडलं. रस्ते बनवणाऱ्या कंपनीला त्यांनी ऑक्सिजन प्लांट बनवण्याचे कंत्राट दिले. 'लाईफलाईन' नावाच्या एका कंपनीला कोविड रुग्णालय चालवण्याचे कंत्राट दिले. खरतर ही 'लाईफलाईन' नव्हे तर 'डेडलाईन' होती. मुंबईच्या तिजोरीतून कुणी घरं भरली याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. काल्पनिक रुग्ण, काल्पनिक रुग्ण काल्पनिक औषध वाटप केल्यानंतर स्वतः घरी बसून काहींनी आपण नंबर एकचे मुख्यमंत्री असल्याचा दावा केला. फेक सर्टिफिकेट दाखवून स्वतःला नंबर एकचे सर्टिफिकेट दाखवणाऱ्यांचा पुढून नव्हे तर मागून नंबर होता," असा घणाघातही शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

Powered By Sangraha 9.0