‘सॅम बहादुर’ पेक्षा ‘अ‍ॅनिमल’ ठरला वरचढ, पहिल्याच दिवशी कमवला कोटींचा गल्ला

02 Dec 2023 11:58:54

animal and sam bahadur 
 
मुंबई : विकी कौशल आणि रणबीर कपूर यांचे सुपरिहट चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘सॅम बहादुर’ आणि ‘अॅनिमल’ या दोन्ही चित्रपटांचा आमना सामना बॉक्स ऑफिसवर झाला असून यात ‘अॅनिमल’ चित्रपट वरचढ ठरला आहे. दरम्यान, दोन्ही चित्रपटांनी पहिल्याच दिवशी कोटींच्या घरात कमाई केली असली तरी ‘अॅनिमल’ चित्रपटाने ‘सॅम बहादुर’ चित्रपटाला भरपूर मागे टाकले आहे.
 
‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार ‘सॅम बहादुर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात ५.५ कोटी रुपयांची कमाई केली असून. ‘अॅनिमल’ने पहिल्या दिवशी देशभरात तब्बल ६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापुरवी देखील ऑगस्ट महिन्यात सनी देओलचा ‘गदर २’ आणि अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत समोरासमोर उभे ठाकले होते. यात ‘गदर २’ चित्रपट वरचढ ठरत या चित्रपटाने ६०० कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवला होता.
 
दोन्ही चित्रपटांच्या कथानकाबद्दल बोलयाचे झाल्यास विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाची कथा देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. तर, रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची कथा वडिल आणि मुलाच्या नात्याची असून, आपल्या वडिलांच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी एक मुलगा किती जीवाचे रान करु शकतो हे दाखवण्यात आले आहे.
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना अशी तगडी कलाकारांची फौज आहे. तर ‘सॅम बहादुर’ या चित्रपटात विकी कौशल, सान्या मल्होत्रा व फातिमा सना शेख यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0