‘थ्री इडियट्स’मधील ‘चतुर’चे मराठीत पदार्पण; हटके चित्रपटाच्या नावानेच वेधले लक्ष

02 Dec 2023 12:26:04

omi vaidya 
 
मुंबई :  ‘थ्री इडीयट्स’ या सुपरहिट चित्रपटातील चतुर रामलिंगम अर्थात सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर प्रेक्षकांना ओमी वैद्य केरळी, केन्यन, मल्याळी, आफ्रिकन आहे असे वाटत होते. पण तो एक मराठमोळा कलाकार आहे. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे ओमीने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळातल्या गणेश उत्सवातल्या नाटकाने केली होती. आता ओमी मराठी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ओमीची मराठीतील प्रमुख भूमिका असलेला 'आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटातून ओमी मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून हा धम्माल विनोदी चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
चित्रपटाचा नायक समर (ओमी वैद्य), अमेरिकेतून भारतात आल्यावर अनपेक्षित वळणांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वाक्यागणिक मराठीचा अपभ्रंश करणारा, धेडगुजरी बोलणाऱ्या समरची कायापालट होऊ शकते का? साता समुद्रापार वसलेली आपल्या महाराष्ट्राची मुलं बाळं एक आधुनिक "मराठीपण" जोपासू शकतील का? असे 'आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटाचे कथानक असणार आहे.
 
‘सॅम बहादुर’ पेक्षा ‘अ‍ॅनिमल’ ठरला वरचढ, पहिल्याच दिवशी कमवला कोटींचा गल्ला  
 
टीएटीजी फिल्म्स एलएलपीची प्रस्तुती असलेल्या 'आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, राजन वासुदेवन, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केली आहे.
 
'आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटात ओमी वैद्य , संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार,सायली राजाध्यक्ष सुधीर जोगळेकर या कलाकारांची फौज दिसणार आहे.
Powered By Sangraha 9.0