हिंदी ‘बिग बॉस’ला आवाज देणाऱ्या कलाकाराला आल्या जीवे मारण्याच्या धमक्या

02 Dec 2023 16:15:01

big boss 17 
 
मुंबई : कलर्स हिंदी वाहिनीवर सध्या ‘बिग बॉस’चे १७ वे पर्व चालू आहे. या लोकप्रिय कार्यक्रमाचा जगभरात चाहता वर्ग आहे. या कार्यक्रमाची खासियम म्हणजे बिग बॉसचा आवाज. नेमकी हा आवाज कोण देतं? ती हे कुणालाच माहित नव्हते. पण कालांतराने या कार्यक्रमाचे निवेदक आणि विजय विक्रम सिंह आहेत हे समोर आले.
 
नुकतीच विक्रम यांनी ‘बॉलीवूड बबल’ला एक मुलाखत दिली. यात त्यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. दोन वर्षात एका लोकप्रिय स्पर्धकाला बाहेर काढल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाअनेक धमक्या आल्या होत्या असे त्यांनी सांगितले. विक्रम म्हणाले की, “एका लोकप्रिय स्पर्धकाला बाहेर काढल्यानंतर गेल्या दोन वर्षांत त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं. “एका स्पर्धकाला शोमधून काढल्यामुळे गेल्या दोन वर्षांत माझ्याशी अनेक वेळा ऑनलाइन गैरवर्तन करण्यात आले. मी त्यांना सांगत राहिलो की मी त्यांना शोमधून बाहेर काढत नाही, हे लोकांची दिलेल्या मतांच्या आधारे ठरवले जाते. पण लोकांनी माझ्या कुटुंबालाही या सगळ्या प्रकरणात ओढले आणि ते त्यांनाही धमक्या देऊ लागले. खरं तर मी तो आवाज नाही जो स्पर्धकांना घराबाहेर जायला सांगतो,” असे देखील ते म्हणाले.
 
पुढे त्यांनी सांगितले की, “मी फक्त दुसरा आवाज आहेत, जो बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या घडामोडी सांगतो, तसेच कोणत्या वेळेत घरात काय घडलं, त्याची माहिती देतो. बिग बॉसचा आवाज खरंच एखाद्या व्यक्तीचा आहे की ती मशीन आहे, याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. जर तो आवाज एखाद्या व्यक्तीचा असेल तरी ती फक्त आपलं काम करत आहे, असं विजय यांनी नमूद केले होते.
Powered By Sangraha 9.0