११० गाई कंटेनरमध्ये भरल्या, ३२ गाईंचा मृत्यु ; ८ जणांना झारखंडमध्ये अटक!

02 Dec 2023 17:55:32
 
cow smuggler
 
 
झारखंड : गिरिडीहच्या जीटी रोडवरील नेमियाघाट पोलीस स्टेशन हद्दीतील तुरी टोलाजवळ पोलिसांनी गुरांनी भरलेली तीन वाहने पकडली आहेत. मोठ्या संख्येने गायींना भरण्यात आले होते. यात 32 गायींचा मृत्यु झाला होता. ही वाहने बंगाल आणि बांगलादेशात पाठवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पोलिसांनी ही वाहने (2 कंटेनर आणि 1 पिकअप व्हॅन) थांबवून त्यांची तपासणी केली असता, त्यांच्यामध्ये एकूण 110 गायी आढळून आल्या. तस्कर ही वाहने बिहारमधून शेरघाटीमार्गे बंगालमधील कोलकाता येथे घेऊन जात होते. याप्रकरणी पोलिसांनी 2 चालकांसह 8 तस्करांना अटक केली.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, या गुरे तस्करांची माहिती मिळाल्यानंतर एसपींनी डुमरी एसडीपीओ सुमित प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली, जी कुलागो टोल प्लाझाजवळ वाहनांची तपासणी करत होती. ही तिन्ही वाहने येताच पोलिसांना पाहताच त्यांनी कंटेनर व पिकअप व्हॅन वेगात पळवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तिन्ही वाहनांचा पाठलाग केला. अखेर तस्करांची कार तिचा तोल गेल्याने धडकून पलटी झाली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तिन्ही वाहने ताब्यात घेऊन गायींची सुटका केली. वाहन उलटल्याने काही गुरे मरण पावली असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
दैनिक जागरणच्या अहवालात असे म्हटले आहे की,जनावरांना एकामागून एक इतके क्रूरपणे वाहनांच्या आत टाकण्यात आले होते की ते हलूही शकत नव्हते. त्यांनी कंटेनरमध्ये 50 गायी भरल्या होत्या. दुसऱ्या एकात 43 गायी होत्या. याशिवाय पिकअप व्हॅनमध्ये 17 गायी भरल्या होत्या. त्यापैकी 8 गायींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिवंत राहिलेल्या सर्व गायी पोलिसांनी मधुबम गोशाळेत पाठवल्याचं सांगण्यात येत आहे.
 
पोलिसांनी गाय तस्करी प्रकरणी चालक फैज खान, भभुआचे रहिवासी फैयाज खान, रामकिशन राय आणि शुभम कुमार यांना अटक केली आहे. याशिवाय हसनई खान, सलाउद्दीन कुरेशी, अली शेर कुरेशी आणि कल्लू आलम आणि तौफिक फकीर भाबुआ यांना अटक करण्यात आली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0