महापारेषणला तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान!

02 Dec 2023 17:23:48
Mahapareshan news

नवी दिल्ली
: पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण ऑस्ट्रियाच्या दूतावासाचे व्यापार उपायुक्त बर्नर्ड ऍंडरसन यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ऍन्ड पीआर, ब्रॅंडिंग, सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला. महापारेषणचे संचालक (मनुष्यबळ विकास) सुगत गमरे व जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले.

नवी दिल्लीतील डॉ. भीमराव आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवाच्या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जागतिक बॅंकेचे वरिष्ठ ऊर्जा सल्लागार श्री. राजीव रंजन मिश्रा, इंडिया टुडेचे संचालक श्री. ध्रुबा ज्योती पती, `पीआरएसआय`चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, सचिव डॉ. पीएलके मूर्ती यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
जनसंपर्क विभाग अग्रेसर

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी यशाचे संपूर्ण श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व मीडियात सातत्याने होणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने कामांमध्ये वैविध्यता आणून सकारात्मक बदल केले. विशेषतः सोशल मीडियाव्दारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, टेलिग्राम, थ्रेडस) जनसंपर्क विभागाने महापारेषणची भूमिका लोकांसमोर ठळकपणे मांडली. भविष्यातही, महापारेषणचा जनसंपर्क विभाग सातत्यपूर्ण कामगिरी करून महापारेषणचे नाव उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.

 
Powered By Sangraha 9.0