व्हॅटिकन सिटी: पोप फ्रान्सिस यांनी पादरींना समलिंगी जोडप्यांना आशीर्वाद देण्याची परवानगी दिली आहे. LGBTQ समुदायासाठी व्हॅटिकनचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वी २०२१ मध्ये व्हॅटिकनने समलैंगिक संबंधांना 'पाप' म्हटले होते. देव पाप करणाऱ्याला आशिर्वाद देत नाही म्हणूनच समलिंगी जोडप्यांना आशीर्वाद देता येणार नाही असे पोप फ्रान्सिस यांनी पुर्वी म्हटले होते.
पण आता "जे देवाकडून प्रेम आणि दयेची आशा ठेवतात त्यांना नैतिकतेच्या निकषांवर न्याय देऊ नये. अस पोप फ्रान्सिस यांनी यावेळी म्हटले आहे. हे व्हॅटिकनच्या दोन वर्षे जुन्या निर्णयाच्या थेट विरुद्ध आहे. पण आता जरी त्यांनी समलिंगी जोडप्यांना आशीर्वाद देण्यास परवानगी दिली असली तरी चर्चमध्ये लग्न करण्यास मात्र परवानगी नाकारली आहे. लग्न करण्याच्या उद्देशाने न आलेल्या जोडप्यांनाच फक्त आशीर्वाद देता येतील अस पोप फ्रान्सिस यांच म्हणण आहे.
त्यांनी समलैंगीक जोडप्याच्या विवाहासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
- समलिंगी जोडप्यांना धार्मिक पद्धतीने आशीर्वाद दिला जाणार नाही.
- याला कोणत्याही प्रकारे विवाह सोहळ्याचे स्वरूप दिले जाणार नाही.
- विवाह पार पाडणारे पादरी त्यांचा पारंपारिक पोशाख परिधान करणार नाहीत.
- पादरींना ते लग्न लावत आहेत असे वाटेल अशी भाषा आणि हावभाव वापरता येणार नाहीत.
- समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देताना बोलल्या जाणार्या प्रार्थना आणि शब्द कुठेही लिहून ठेवले जाणार नाहीत.
पोप फ्रान्सिस यांनी समलैंगीक विवाहाला परवानगी तर दिली पण त्याला विवाह संस्कार मानण्यास नकार दिला आहे.