सुप्रीया सुळे, अमोल कोल्हेंसह ४९ खासदार निलंबित!

19 Dec 2023 13:03:34

Supriya Sule & Amol Kolhe


नवी दिल्ली :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच खासदार अमोल कोल्हे यांचेदेखील निलंबन करण्यात आले आहे. मंगळवारी अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून मंगळवारी विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी देखील एकूण ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

 
अनेकदा सुचना देऊनही नियमांचे उल्लंघन केल्याने विरोधी पक्षांच्या खासदारांवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दुपारी २ वाजेपर्यंत संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी काही खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.



Powered By Sangraha 9.0