नितेश राणे-प्रणिती शिंदे यांच्यात खडाजंगी! नेमकं काय घडलं?

19 Dec 2023 16:23:31

Nitesh Rane & Praniti Shinde


नागपूर : मंगळवारी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. प्रणिती शिंदेंनी सभागृहात अश्वजित गायकवाड यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर नितेश राणे चांगलेच संतापले आणि हा मुद्दा रेकॉर्डवरून काढून टाकण्याची मागणी केली.
 
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "मुंबईमध्ये अश्वजित गायकवाड यांनी एका महिलेवर अत्याचार करत तिला गाडीने फरफटत नेलं. परंतू, याप्रकरणी एसआयटीमध्ये तिचा जाब घेण्यात आला नाही. तसेच अश्वजित गायकवाडला याप्रकरणी जामीनही मिळाला. त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी," असे त्यांनी म्हटले.
 
यावर नितेश राणे म्हणाले की, "सध्या औचित्याचे मुद्दे सुरु असून अशा प्रकारे पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन कधीही विचारता येत नाही. त्यामुळे हे रेकॉर्डवरून काढून टाकावे. जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा त्या हे विचारू शकतात. कधीही उठून काहीही विचारू शकत नाही. हे नियमबाह्य आहे. त्यामुळे ते रेकॉर्डवरून काढून टाकावे," अशी मागणी त्यांनी केली. यावर अध्यक्षांनी मध्यस्ती करत केवळ औचित्याचाच मुद्दा रेकॉर्डवर येईल बाकी येणार नाही, असे सांगितले.




Powered By Sangraha 9.0