पॉस्को प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमला जावा! नीलम गोऱ्हेंचे निर्देश
19 Dec 2023 18:56:06
नागपूर : पॉस्को अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सरकारने विशेष सरकारी वकिलाची लवकर नेमणूक करणे आवश्यक आहे. न्याय प्रक्रियेमध्ये विशेष सरकारी वकिलामार्फत आपण हस्तक्षेप करायला हवा असे निर्देश विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे. मंगळवारी विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या.
तसेच अशा प्रकरणांमध्ये मुली गरोदर राहिल्याने त्यांची प्रसुती होण्याच्या घटना देखील घडताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी एक महिन्याच्या आतमध्ये वैद्यकीय निर्णय घेतला पाहिजे अशी सूचनाही गोन्हे यांनी दिली आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपसभापतींनी दिलेल्या निर्देशाचे पालन केले जाईल असे सांगितले.