'या' २ ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएल २०२४ मोसमातील सर्वाधिक बोली

19 Dec 2023 16:34:48
IPL 2024 Auction in Dubai two australian players gets crores

नवी दिल्ली :
आयपीएल २०२४ मोसमाकरिता खेळाडूंचा लिलाव दुबई येथे करण्यात येत आहे. या लिलावात दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कोटींची बोली लागली आहे. यात ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याला २४.७५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. दरम्यान, मिचेल स्टार्क हा कोलकाता नाईट रायडर्सच्या तब्बल २४ कोटी रुपयांच्या बोलीसह विकत घेत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
 
दरम्यान, आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव दुबईमध्ये झाला. यामध्ये पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशा प्रकारे पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण त्याचा हा विक्रमही तासाभरात मोडला. कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रुपयांची विकत घेतले.
 
तसेच, ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडला सनरायझर्स हैदराबादने ६ कोटी ८० लाख रुपयांची बोली लावली आहे. दरम्यान, लिलावावेळी चेन्नई सुपर किंग्जने त्याला विकत घेण्याचा प्रयत्न केले होते. पण हैदराबादने यात बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या हॅरी ब्रुकलाही आज मोठी बोली लागली असून दिल्ली कॅपिटल्सने तब्बल ४ कोटी रुपयांना विकत घेत आपल्या संघात स्थान दिले.
 
कमिन्सला विकत घेण्यासाठी आरसीबीनेही धडपड केली, पण सनरायझर्सने बाजी मारली. कमिन्सची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. कमिन्सला विकत घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जोरदार बोली रंगली होती. तरी सनरायझर्स हैदराबादने त्याला २० कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतले. सनरायझर्स हैदराबादने त्याला विकत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
Powered By Sangraha 9.0