सुषमा अंधारेंविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव!

19 Dec 2023 15:34:48

Sushma Andhare & Devyani Farande


नागपूर : उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवार, दि. १९ डिसेंबर रोजी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. २८ नोव्हेंबर रोजी अंधारे यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन अमली पदार्थांच्या तस्करीत आमदार फरांदे यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला होता. याविषयी हा हक्कभंग त्यांनी आणला.
 
याविषयी सभागृहात बोलतांना देवयानी फरांदे म्हणाल्या, नाशिक अमली पदार्थमुक्त व्हावे, यासाठी मी स्वत: पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांना पत्र दिले आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असल्यामुळे सुषमा अंधारे माझ्यावर आरोप करत असल्याची भूमिका या वेळी आमदार देवयानी फरांदे यांनी सभागृहात मांडली. त्यावर, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याविषयी ‘पडताळणी करून निर्णय घेऊ’, असे आश्वासन दिले.


Powered By Sangraha 9.0