‘ॲनिमल' च्या गर्दीत 'सॅम बहादुर'नेही कमावले ‘इतके’ कोटी

18 Dec 2023 13:23:04
 
sam and animal
 
मुंबई : हिंदीतील दोन मोठे चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाले. रणबीर कपूरचा 'ॲनिमल' आणि विकी कौशलचा 'सॅम बहादुर'. मात्र, ॲनिमल चित्रपटाने कमावलेल्या कोट्यावधींच्या गर्दीत कुठेतरी सॅम बहादुर हरवला असे वाटत असताना या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई समोर आली आहे.
 
Sacnilk च्या माहितीनुसार, विकी कौशलच्या सॅम बहादुर चित्रपटाने प्रदर्शनानंतर आत्तापर्यंत या चित्रपटाने ७३.९१ कोटींची कमाई केल्याचे समजत आहे. सॅम बहादुर चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत २० कोटींच्या घरात कमाई केली होती. देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या बायोपिकमध्ये विकी कौशल याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. तसेच, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मेघना गुलजार यांच्या हाती होती. विकी कौशलच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास तो शाहरुख खान सोबत डंकी चित्रपटात झळकणार असून २१ डिसेंबर रोजी देशभरात चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0