‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार होणार ‘डिलिव्हरी बॉय’

18 Dec 2023 14:58:16

marathi film 
 
मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे जगभरात चाहते आहेत. या कार्यक्रमातील विनोदवीर एक एक करत मराठी चित्रपटांत काम करताना दिसत आहेत. नुकताच अभिनेता गौरव मोरे बॉईज ४ आणि लंडन मिसळ या चित्रपटात झळकला होता. आता त्याच्यापाठोपाठ अभिनेता पृथ्वीक प्रताप देखील लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पृथ्वीक 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंज करणार असून त्याला अभिनेता प्रथमेश परब याची साथ लाभणार आहे.
 
'डिलिव्हरी बॉय' हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर येतो तो घरी येऊन सामान देणारी ‘डिलिव्हरी बॉय’. मात्र सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे, ते सोशल मीडियावर झळकलेल्या ‘डिलिव्हरी बॅाय’ने. एका बॅाक्समध्ये छोटे बाळ दिसत आहे. आता हे बॅाक्समधील बाळ आणि डिलिव्हरी बॅायचा नेमका संबंध काय, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 

marathi film post 
 
दरम्यान हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मोहसीन खान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Powered By Sangraha 9.0