"इस्लाम युरोपीय संस्कृतीशी सुसंगत नाही!", इटलीच्या पंतप्रधानांचं 'ते' वक्तव्य पाच वर्षांपूर्वीचं
व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा चर्चा
18-Dec-2023
Total Views |
रोम : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक युरोपातील इस्लाम याबद्दलचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला. व्हीडिओतील सबटायटल्स आणि शीर्षकावरून त्यांचे हे वक्तव्य पाच वर्षांनी पुन्हा चर्चेत आले आहे. इस्लाम हा युरोपीयन संस्कृतीशी सुसंगत नाही, इथली मुल्य आणि संस्कृती इस्लामला मान्य नाही.
सौदी अरेबियातून इस्लामचा प्रचार प्रसार इटलीत केला जात आहे. सौदी अरेबियात शरीया कायदा लागू आहे, तो कायदा इथल्या संस्कृतीशी सुसंगत नाही." शनिवार, दि. १६ डिसेंबरपासून त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला. त्यानंतर याच आशयाचे वक्तव्य त्यांनी केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. मात्र, त्यांनी केलेले हे विधान सुमारे पाच वर्षांपूर्वीचे आहे.
The whole of Europe is being Islamised.
There is no similarity between our culture and Islam.
Islam is being spread by Saudi in Italy.
There is Sharia law in Saudi, which we will not allow to be implemented in Italy.
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) December 17, 2023
इटलीत नुकताच ब्रदर्स ऑफ इटली पार्टी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्कही उपस्थित होते. बऱ्याच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय माध्यम संस्थांनी या मथळ्याचे वृत्तांकन केल्याने पाच वर्षांपूर्वीच्या वक्तव्यामुळे जॉर्जिया पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
"यूरोप में हमारी सभ्यता के मूल्यों से बहुत दूर इस्लामीकरण की एक प्रक्रिया चल रही है."
आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांपैकी कुठल्याही वृत्तपत्राने अशा स्वरूपातील बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. स्वतः मेलोनी यांच्या ट्विटर अकाऊंटवर अशा प्रकारचा कुठलाही व्हीडिओ उपलब्ध नाही. मात्र, तरीही पाच वर्षांपूर्वीच्या त्यांच्या व्हीडिओचा काही भाग RadioGenoa या X अकाऊंटवर सर्वात आधी पोस्ट करण्यात आला. त्यानंतर सर्वच ठिकाणी या वक्तव्याची चर्चा झाली. पाच वर्षांपूर्वी ALA News नावाच्या युट्यूब चॅनलवर हा व्हीडिओ प्रसारित करण्यात आला आहे.