जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्र असलेल्या 'स्वरवेद महामंदिर'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

18 Dec 2023 17:15:49
PM Modi inaugurates Swarved Mahamandir in Varanasi

मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची धार्मिक-आध्यात्मिक राजधानी वाराणसी येथे जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्र असलेल्या 'स्वरवेद महामंदिर'चे उद्घाटन केले. अंदाजे 3 लाख स्क्वेअर फुटात बांधलेल्या स्वरवेद महामंदिरात २० हजार लोक एकाच वेळी योगा करू शकतात. तर या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी २५ हजार कुंड्या स्वरवेद ज्ञान महायज्ञही पार पडला.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मी पाहत होतो की, स्वरवेदाच्या भिंतींवर सुंदर चित्रण करण्यात आले आहे. वेद, उपनिषद, रामायण, गीता आणि महाभारत इत्यादी ग्रंथांचे दैवी संदेशही चित्रांच्या माध्यमातून कोरण्यात आले आहेत. हे मंदिर अध्यात्म, इतिहास आणि संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे.

हा कार्यक्रम दि. १७ ते १८ डिसेंबर २०२३ रोजी विहंगम योग संत समाजाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शताब्दी समारंभ महोत्सव’ निमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हजारो लोकांनी सहभाग घेऊन विहंगम योग केला. ज्या स्वरवेद महामंदिराच्या निर्माणाकरिता ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

Powered By Sangraha 9.0