बांग्लादेशी महमूद आलम बनला किशोर कुमार, 'IB'कडून अटक

18 Dec 2023 16:45:46
Mahmood Alam turned Kishore Kumar police handed over to IB
 
जयपूर : राजस्थान पोलिसांनी उपचाराकरिता रुग्णालयात आलेल्या व्यक्तीचा पर्दाफाश करत सदर व्यक्तीस आयबीच्या ताब्यात दिले. बांगलादेशचा महमूद आलम ही व्यक्ती किशोर कुमार म्हणून भारतात राहत होता. तो उपचारासाठी रुग्णालयात आला तेव्हा त्याला राजस्थान पोलिसांनी पकडून आयबीच्या ताब्यात दिले.
 
दरम्यान, चौकशी करताना तरुणाने स्वत: बांगलादेशचा रहिवासी असल्याचे जाहीर केले असून महमूदच्या वडिलांचे नाव शमशुल आलम असे आहे. ते बांगलादेशातील मदिरापुरा येथील दुर्गावोर्डी गावचे रहिवासी आहेत. महमूद आलमचा पासपोर्टही याच नावाने आणि पत्त्याने बनवल्याचे समोर आले आहे.

सदर व्यक्ती ही किशोर कुमार या हिंदू नावाने सुमारे ७ महिने भारतात राहत होती. राजस्थान पोलिसांनी कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्याला इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या ताब्यात दिले आहे. तसेच, कामानिमित्त व्हिसा घेऊन भारतात आल्याचेही महमूदने सांगितले. पण त्याच्या व्हिसाची मुदत मे २०२३ मध्येच संपली असून त्यानंतर तो बांगलादेशला परतला नाही. सध्या हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने तपास आयबी करत आहे. तसेच, महमूदकडे सापडलेल्या कागदपत्रांचीही पोलीस चौकशी करत आहेत.
Powered By Sangraha 9.0