मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेला मुंबईत हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर सध्या अंधेरीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याच्या तब्येतीसंदर्भात श्रेयस तळपदेच्या पत्नीने दिप्ती तळपदेने श्रेयसच्या तब्येतीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने श्रेयसची तब्येत बरी असून त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
काय आहे दिप्ती तळपदेची पोस्ट?
श्रेयसच्या तब्येतीसाठी अनेकांनी चिंता व्यक्त करत प्रार्थना केली होती. त्या सर्वांचे आभार. सध्या श्रेयसची तब्येत स्थिर असून त्याला काही दिवसांत डिस्चार्ज दिला जाईल. श्रेयसला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील मेडिकल टीमने वेळेत दिलेली ट्रिटमेंट आणि उत्तमरित्या घेतलेली काळजी महत्वाची ठरली आहे, त्यासाठी रुग्णालयातील संपूर्ण टीमचे आभार.
तसेच, दिप्तीने पोस्टमध्ये श्रेयस रिकव्हर होत असून त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती केली आहे. सर्व चाहत्यांनी दिलेला पाठिंबा आम्हा दोघांसाठी प्रचंड महत्त्वाचा तसंच अशा काळात ताकद देणारा ठरत असल्याचंही तिने म्हटले आहे.