श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरण – शाही ईदगाहचे न्यायालयीन सर्वेक्षण होणारच

15 Dec 2023 21:16:19
Shri Krishna Janmabhoomi news

नवी दिल्ली
: मथुरेतील वादग्रस्त शाही ईदगाह मशिदीच्या परिसराचे न्यायालयीन सर्वेक्षण करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरूवारी मथुरेतील वादग्रस्त शाही ईदगाह मशिदीच्या परिसराचे न्यायालयीन सर्वेक्षण करण्याची हिंदू पक्षाची विनंती मान्य केली आहे. मुस्लिम पक्षाने या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयास आव्हान दिले होते.

या प्रकरणाचा शनिवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी उल्लेख केला. यावेळी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती देण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने मुस्लिम पक्षाची विनंती स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी हे प्रकरण ९ जानेवारी रोजी सुनावणीच्या यादीत असून त्यावर जानेवारी २०२४ मध्येच विचार केला जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, आजच्या सुनावणीनंतर शाही ईदगाह परिसराचे न्यायालयीन सर्वेक्षण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



 
 
Powered By Sangraha 9.0