नितेश राणेंच्या गौप्यस्फोटानंतर गोगावलेंनीही मौन सोडलं...

15 Dec 2023 16:51:46
Shivsena MLA Bharat Gogawale

महाराष्ट्र :
भाजप आ. नितेश राणे यांनी अधिवेशनात केलेल्या गौप्यस्फोटावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आ. भरत गोगावले यांनी अखेर मौन सोडले आहे. ते म्हणाले, सदर व्हिडिओ क्लिपमध्ये जे दिसत आहे ती वस्तुस्थिती असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज जर हयात असते तर त्यांना लाथ मारुन बाहेर काढले असते, असे आ. गोगावले यावेळी म्हणाले. तसेच, उबाठा गटाच्या नेत्यांनादेखील ते आता कळले असून त्यांनीदेखील निर्णय घ्यावा, असा टोलाही भरत गोगावले यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, भाजप आ. नितेश राणे यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बब्लास्टच्या हल्लेखोरासोबत उबाठाच्या नाशिक महानगर प्रमुखाचे पार्टी करतानाचे फोटो आणि व्हीडिओ सभागृहात सादर करत मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT द्वारे या प्रकरणाची चौकशी होईल, असे आदेश दिले आहेत.

Powered By Sangraha 9.0