चंद्रपुरात केंद्रीय योजनेतून १० हजार आवास उभारणार; पालकमंत्री मुनगंटीवार यांचा पुढाकार

15 Dec 2023 16:31:41
Cabinet Minister Sudhir Mungantiwar

महाराष्ट्र :
आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात १० हजार नवीन घरकूल उभे राहणार, अशी घोषणा पालकमंत्री तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्रीय योजनेतून दहा हजार घरांची निर्मिती करण्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर झाला असून स्वतः पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडून या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेतून चंद्रपुरात नवीन घरकुल उभे राहतील, असा विश्वास त्यांनी नागपुरात व्यक्त केला आहे.

याकरिता महात्मा फुले नविनीकरण उर्जा व पायाभूत तंत्रज्ञान लिमिटेड (महाप्रित) आणि चंद्रपूर महानगरपालिका मिळून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरबांधणी प्रस्तावासंदर्भात पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील हरिसिंग वनसभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महाप्रितचे संचालक पुरुषोत्तम जाधव, मुख्य लेखाधिकारी डी.सी.पाटील, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्राचे संचालक अशोक जोशी, वैज्ञानिक संजय बालमवार तर दूरदृष्यप्रणालीद्वारे मुंबईवरून प्रधान सचिव दीपक म्हैसेकर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0