संसदेत गोंधळ घालणाऱ्या हल्लेखोरांना खलिस्तानी पन्नूकडून १० लाखाचे बक्षीस!

14 Dec 2023 11:55:51

Gurpatwant Singh Pannu 
 
 
नवी दिल्ली : 'शिख फॉर जस्टिस'चे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी संसद भवनात घुसून गोंधळ घालणाऱ्या लोकांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. 13 डिसेंबर रोजी लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात उडी टाकून गोंधळ घातला. त्यात सहभागी असलेल्या ७ जणांपैकी ६ जणांना (विशाल-वृंदा, नीलम देवी, अमोल शिंदे, सागर शर्मा, डी मनोरंजन) पोलिसांनी अटक केली आहे. हे सहा आरोपी 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि काही काळापासून ही घटना घडवण्याचा कट रचत होते. संसदेत हे कृत्य करण्यापूर्वी त्यांनी रेके केल्याचेही बोलले जात आहे.
 
 
 
यापूर्वी पन्नू म्हणाले होते की, "भारतीय एजन्सींचा आपल्या हत्येचा कट फसला असून आपण संसदेवर हल्ला करून प्रत्युत्तर देऊ." संसदेतील सुरक्षेतील त्रुटींमागे खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा हात असण्याची शक्यता पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांनी ६ जणांविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व सिंग फॅन क्लबच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सागर शर्मा नावाच्या आरोपीला संसदेच्या सुरक्षा तपासणीबाबत जाणून घ्यायचे होते. अमोल शिंदे हा आरोपी असून तो धुराची डबी घेऊन आला होता,
 
त्यांची योजना संसदेत घुसण्याची होती. मात्र सागर शर्मा आणि मनोरंजन यांनाच पास मिळाले. यावेळी नीलम आणि अमोल यांनी लोकसभेबाहेर हुकूमशाही बंद करा अशा घोषणा दिल्या. या संपूर्ण गोंधळानंतर दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने ६ आरोपींना पकडले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले आहे. गृह मंत्रालयाने संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. सीआरपीएफचे डीजी अनिश दयाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0