मराठीतील पहिले रिव्हर्स मोशन गाणे प्रदर्शित, अंकिता वालावलकर प्रमुख भूमिकेत

11 Dec 2023 13:38:42

ankita 
 
मुंबई : मराठीत नवनवीन धाडसी प्रयोग व्हायला लागलेत, असाच एक धाडसी प्रयोग रिव्हर्स मोशनमध्ये उलगडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे प्रणिल आर्ट्स निर्मित “कसे विसरू” हे गाणं. अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं, नातं बहरु लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण काय असू शकतं? हे व्यक्त करणारी आजवर कधीही न पाहिलेली “सरळ चालणाऱ्या नाजूक नात्याची ही उलटी गोष्ट…” म्हणजेच "कसे विसरु" ?
 
"दादर अभिमान गीता"च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा हा तिसरा व्हिडिओ असून या अनोख्या प्रयोगाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.गाण्याची पटकथा, दिग्दर्शन, मांडणी ही प्रणिल हातिसकरने केली आहे. तसेच प्रख्यात गायक केवल वाळंज ह्यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं स्वरबद्ध केले आहे.
 
या गाण्यातून आपल्या सर्वांची लाडकी कोकणहार्टेडगर्ल अर्थात अंकिता वालावलकर व सध्याचा मराठी मालिकांमधील आघाडीचा अभिनेता विवेक सांगळे अशी नवीन जोडी आपल्या भेटीला आली असून ही दोघांची जोडी फार सुरेख दिसत असून त्यांचा अभिनय सुद्धा साजेसा झालेला आहे.
 
एखादी गोष्ट सरळ दाखवणं हे रिव्हर्स मोशनच्या तुलनेत बऱ्यापैकी सोप्पं आहे, कारण जेव्हा तुम्ही गोष्ट उलटी उलगडत आपण नेतो त्यावेळेस कलाकारांचे हावभाव सुद्धा बदलतात.ही गोष्ट फार बारकाईने करावी लागते आणि तेच बारकावे अत्यंत सुरेख पद्धतीने हाताळून प्रणिल हातिसकर ह्यांनी “कसे विसरू” ह्या गाण्याची रिव्हर्स मोशनमध्ये निर्मिती केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0