मुंबई : 'धर्मवीर' चित्रपटाच्या यशानंतर आता सिनेरसिकांना 'धर्मवीर २' चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. धर्मवीर २ या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेता प्रसाद ओक आणि निर्माता मंगेश देसाई यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत या चित्रपटाच्या चित्रीकरणाची पहिली झलक दिली आहे.
दरम्यान, धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक स्वतः असून त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, असा हा धर्मवीर...तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा...असे कॅप्शन आपल्या पोस्टला दिले आहे.
तर निर्माता मंगेश देसाई म्हणाले, आता महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कळेल की धर्मवीर आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट मराठी आणि हिंदी भाषेतून सर्वांना पाहायला मिळणार आहे.