कर्तव्य - द एनजीओ मेला अंतर्गत सायक्लोथोन मोहिमेचे आयोजन

10 Dec 2023 16:59:55
Kartavya The NGO Mela
 
मुंबई :   'कर्तव्य - द एनजीओ मेला' कार्यक्रमाअंतर्गत विविध एनजीओला समाज माध्यमांशी जोडण्याचा अथक प्रयत्न करत असतो. येत्या १० डिसेंबर रोजी ससमीरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च द्वारा हा नियोजित कार्यक्रम आखण्यात आला आहे. एनजीओंना आपल्या कामचाप्रसार करण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी समाजातून मदत मिळवून देण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील असतो.
 
आमच्या याच प्रयत्नाची जनजागृती करण्यासाठी सायक्लोथोन हा एक कार्यक्रम. हा कार्यक्रम विद्यार्थी वा अनेक सामान्यांना एका विशिष्ट कारणासाठी म्हणजेच समज प्रबोधनासाठी एकत्रीत आणतो. सायकलिंग प्रेमींसाठी ही एक मेजवाणी आहेच त्याच बरोबर इतरांसाठी सुद्धा खुला असलेला हा कार्यक्रम आरोग्य, एकता आणि सामाजिक जबाबदारी जाणीव समाजात रोवण्याचं काम करतो.
 
सायक्लोथोन या सायकलिंग इव्हेंट वेळी सहभागी विद्यार्थी आणि इतर, कर्तव्य-द एनजीओ मेला चा प्रसार करतील. तसेच विविध एनजीओज सायकलिंग करण्याच्या मार्गात आपापली जागृक्ता केंद्रे उभारतील ज्यामध्ये त्यांनी आजवर केलेले प्रभावी उपक्रम, यशोगाथा, योगदान यांची माहिती असेल. सायक्लोथोन हा केवळ एका कार्यक्रम नसून कर्तव्य - द एनजीओ मेला करिता पूर्वसूचित तयार केला जाणारा एक मंच आहे. ज्या मध्ये सहभागी एनजीओज त्यांच्या अंतर्गत आखलेल्या विवध समाजकर्तव्य कार्यक्रमांचं एक अद्भुत प्रदर्शन करतील.

तेव्हा १० डिसेंबर रोजी ससमीरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च आपणास या कार्यक्रमात सामील होण्यास नम्र विनंती करते. आमच्या या उज्वल आणि सामाजिकदृष्ट्या अधिक जागरूक भविष्याकडे वाटचाल करण्याच्या आमच्या वाटेत आपले एक पाऊल सुद्धा आमच्यासाठी मोलाचे असेल.
Powered By Sangraha 9.0