नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० :३० वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’ उपक्रमाची सुरुवात करणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश देशातल्या युवकांना विकसित भारत @2047 च्या पूर्ततेसाठी आपल्या कल्पनांचे योaगदान देण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे हा असणार आहे.
तसेच, देशभरातल्या राजभवनांमध्ये आयोजित कार्यशाळांमध्ये विद्यापीठांचे कुलगुरू आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. दरम्यान, या उपक्रमाची प्रतिकात्मक सुरुवात करतानाच विकसित भारत @2047 साठी आपल्या कल्पना आणि सूचना सामायिक करण्याच्या प्रक्रियेत युवकांना सामावून घेण्यासाठी ही कार्यशाळा हे एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.