अनिल बोरनारे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन; मुंबई शिक्षक मतदारसंघातील कार्याचा अहवालात समावेश

10 Dec 2023 18:57:38
BJP Anil Bornare Book Publishing

मुंबई :
शिक्षकांच्या व एकूणच शिक्षण व्यवस्थेतील समस्यांबद्दल नेहमीच आवाज उठविणारे व मुंबईतील शेकडो शिक्षकांचे प्रश्न सोडविणारे शिक्षक संघटनेचे व भाजपचे नेते अनिल बोरनारे यांच्या कार्य अहवालाचे नुकतेच प्रकाशन झाले. या अहवालाची प्रत नुकतीच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना बोरनारे यांनी सुपूर्द केली. या अहवालात बोरनारे यांच्या कार्याचा आढावा घेतला असून मुंबईतील प्रत्येक शाळेतील शिक्षकांपर्यंत अहवाल पोहचवला जाणार आहे.

दरम्यान, अनिल बोरनारे यांनी शिक्षकांचे शेकडो प्रश्न सोडविले असून त्यात कायम विनाअनुदानित मधील कायम शब्द वगळला, विना अनुदानित शाळांना अनुदान मिळविण्यासाठी केलेल्या आंदोलनात यशस्वी सहभाग, महिला शिक्षिकांना केंद्राप्रमाणे बाल संगोपन रजा, केलेल्या आंदोलनामुळे राज्यातील ९४ हजार शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण, राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना १ तारखेला वेतन देण्यास शासनाला भाग पाडले, ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळवून दिली, शासनाला महागाई भत्याच्या दरात सुधारणा करण्याबाबत भाग पाडले.

सरकारी कर्मचाऱ्यांसोबत प्रथमच शिक्षक-शिक्षकेत्तरांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत यशस्वी पाठपुरावा, मुंबई विभागातील १२०० शिक्षकांना ४६ कोटी रूपयांची थकबाकी मंजूर करून घेतली, सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणाचे राष्ट्रीय काम करणाऱ्या शिक्षकांना मानधनाचे ३४ कोटी रुपये मिळवून दिले, सेवेत असतांना मृत्यू झालेल्या ६८५ शिक्षकांच्या कुटुंबियांना वित्त विभागाकडून मदत मिळवून दिली.

मुंबई व कोकण विभागातील शेकडो सेवा शर्तीच्या संदर्भातील शेकडो प्रश्न सोडविले, राज्यातील शिक्षकांना रोज लेसन प्लॅन काढण्याची सक्ती मागे घेण्यास भाग पाडले, मतदारयाद्या पुनर्निरीक्षणातून शिक्षकांची सुटका केली, शिक्षकांची भरती बंदी उठविली, बोर्डाचे पेपर तापसणार्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळले, सिंधी माध्यमातील अतिरिक्त शिक्षकांचे हिंदी माध्यमात समायोजन करून घेतले.

शिक्षण सेवकांची नियमबाह्य करकपात बंद केली, बंद झालेले अर्धवेळ ग्रंथपालांचे वेतन सुरू केले, अपंग शिक्षकांना उपकरणे खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंतची मदत मिळवून दिली, प्लॅन मधील शिक्षकांचा वेतन प्रश्न सोडविला, एमएमआरमधील २७ गावांमधील शिक्षकांना ३० टक्के घरभाडे भत्ता मिळविण्यासाठी संघर्ष, ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील शाळांचा दोन वर्षांचा मेहनताना मिळवून दिला, शिक्षकांचे टीईटी परीक्षेचे मानधन मिळवून दिले, राज्यातील शिक्षकांना दरमहा सॅलरी स्लिप देणे बंधनकारक केले, कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिकांचा प्रश्न मार्गी लावला, रात्र ज्युनिअर कॉलेजचे बंद झालेले वेतन सुरू केले, निवडणूक अधिकाऱ्यांनी रिझर्व शिक्षकांचे थांबविलेले मानधन मिळवून बोरनारे यांनी मिळवून दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0