पालिकेच्या साहाय्यक अभियंता विरोधात गुन्हा दाखल होणार?

01 Dec 2023 19:11:46

bmc
 
मुंबई: महापालिका जी/उत्तर विभागात न केलेल्या कामाचे पैसे दिल्यामुळे माहिती अधिकाराच्या उत्तरात खोटे पुरावे तयार करुन सादर केल्याबद्दल अमोल गावित, सहाय्यक अभियंता अमोल गावित यांचेवर भादंसं १७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी दादर येथील रहिवासी प्रकाश बेलवाडे यांनी परवानगी मागितली आहे. याबाबत त्यांनी नुकतेच जी/उत्तर कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १७७ अंतर्गत गुन्हा नोंद करून खटला चालवण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
 
पत्रात प्रकाश बेलवाडे म्हणाले आहेत की, मी माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहितीसाठी अर्ज कैला असता अमोल गावित, साहाय्यक अभियंता (परिरक्षण), जी/उत्तर विभाग यांनी मला बनावट तयार केलेल्या खोट्या पोच पावत्या दिल्या आहेत. सदर पोच पावत्या या संपूर्णपणे बोगस आणि भ्रष्टाचार लपविण्याच्या उदेशाने तयार केल्या असून शिवाजी पार्क सौंदर्यीकरण आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पात खोटे पुरावे तयार करणे,
 
हे ही वाचा : अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट!, "मविआ सरकार असताना..." 
 
ठेकेदाराने विशेष अटी आणि शर्थीचे पालन न केल्याने ते केले असल्याचे नमूद करून महापालिकेचे सुमारे १.४६ कोटी रुपये एवढे नुकसान करणे, न झालेल्या कामाचे ते झाले आहे, असे नमूद करून २.५१ कोटी रुपये ठेकेदाराला देण्यासाठी पुरावे तयार करणे, या प्रकारात भारतीय दंड संहितामधील कलम १७७ अंतर्गत गुन्हा दाखल कस्न खटला चालवण्यासाठी सीआरपीसी १९७३ कलम १९७ मधील तरतुदीनुसार आपली प्रवानगी आवश्यक असून कृपया आपले अधिकार आणि कर्तव्ये यांची जबाबदारी आणि खात्यातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी परवानगी देऊन सहकार्य करावे, अशी विनंती बेलवाडे यांनी केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0