लोकसभेत अजितदादा पवारांना दणका देण्याच्या तयारीत! बारामतीही हिसकावणार?

01 Dec 2023 15:25:20
shard vs ajit
 
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्च 2024 च्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूका होतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर लोकसभेला अजित पवार गट चार जागा लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. कर्जत येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी च्या राज्यव्यापी शिबिरात ते बोलत होते.
 
लोकसभेच्या बारामती, शिरूर, रायगड, आणि सातारा या जागा अजित पवार गट लढवणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. यापैकी रायगड (सुनिल तटकरे) येथे अजित पवार गटाचे तर बारामती (सुप्रिया सुळे), सातारा ( श्रीनिवास पाटील) व शिरूर( अमोल कोल्हे) या तीनही  जागांवर सध्या शरद पवार गटाचे खासदार आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत होण्याची श्यक्यता आहे.
 
 हे ही वाचा: संजय राऊतांना वेड्यांच्या रुग्णालयात भरती करावं; शिवसेना प्रवक्त्यांचा घाणाघात
 
त्याचबरोबर महायुतीत ज्या जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यातील काही जागा लढवण्याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहोत असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान बारामती लोकसभा निवडणूक अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढवणार असल्याची चर्चा आहे असे झाल्यास बातमी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळु शकते. दुसरीकडे शिरूर येथे शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता ती जागा अजित पवार गटाने लढवल्यास अमोल कोल्हेंसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
 
 
Powered By Sangraha 9.0