संजय राऊतांना वेड्यांच्या रुग्णालयात भरती करावं; शिवसेना प्रवक्त्यांचा घाणाघात

01 Dec 2023 14:25:29

jyoti waghmare
 
मुंबई: शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सोशल मीडीया वर व्हिडीओ पोस्ट करत संजय राऊतांवर कठोर शब्दात टिका केली आहे. “संजय राऊतांना लवकर रुग्णवाहिकेमध्ये घालून वेड्यांच्या रुग्णालयात भरती करावं, हेच योग्य राहील अस त्यांनी म्हटलं आहे. या व्हिडीओ मध्ये त्यांनी संजय राउतांचा उल्लेख “संजय डाउट” असा केला आहे.
 
"एखाद्या सिनेमात जर शिवी आहे. म्हणुन जर तुम्ही ती शिवी देणार असाल, तर जेंव्हा तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो तेंव्हा महाराष्ट्रातील जनतेला तुम्हाला एखाद्या वेबसिरीज मध्येही नसतील इतक्या शिव्या द्याव्याशा वाटतात. पण आमचे संस्कार आम्हाला त्या देण्याची परवानगी देत नाहीत" अस त्यांनी म्हटलं आहे.
 
 हे ही वाचा: "बिहारमध्ये बेकायदा मशिदी आणि मदरशांचा महापूर! संभाव्य धोक्याची घंटा!"
 
त्या पुढे म्हणाल्या "महाराष्ट्रात दिवसाची सुरुवात पुर्वी जात्यावरच्य़ा ओव्यांनी व्हायची पण आता राउतांच्या शिव्यांनी होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला रसातळाला नेण्याच काम या लोकांनी केलय, आटापीटा करुन मिळवलेली सत्ता गेल्यामुळे ते इतके भ्रमिष्ठ झालेत की चार चौघात शिव्या देत सुटलेत, मन मानेल तशी बेताल बडबड करणाऱ्या राउतांना लवकर रुग्णवाहिकेमध्ये घालून वेड्यांच्या रुग्णालयात भरती करावं.
 
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे.त्यावर बोलताना संजय राऊत यांनी धर्मवीर चित्रपटातही आनंद दिघेंच्या तोंडून तोच शब्द वापरला गेला आहे तर दत्ता दळवीनी वापरण्यास काय हरकत आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यालाच शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0