नोटबंदीनंतर आरबीआयकडे जमा झाल्या ९७.२६ टक्के दोन हजारच्या नोटा; उरलेल्या नोटा जमा करण्यासाठी संधी उपलब्ध

01 Dec 2023 16:08:35
 2000 notes
 
मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर आतापर्यंत एकूण नोटांपैकी ९७.२६ टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) परत आल्या आहेत. आरबीआयच्या अहवालानुसार, २००० रुपयांच्या नोटांचे चलन मे महिन्यातील ३.५६ ट्रिलियन रुपयांवरून नोव्हेंबर अखेरीस ९,७६० कोटी रुपयांवर घसरले आहे.
 
ऑक्टोबरच्या अखेरीस, २००० रुपयांच्या नोटांपैकी ९७ टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) परत आल्या होत्या. पण नोव्हेंबर महिन्यामध्ये अवघ्या ०.२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यासोबतच नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. पण ही मुदत नंतर ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती.
 
सध्या ज्या लोकांकडे २००० रुपयांच्या नोटा आहेत. ते आरबीआय इश्यू ऑफिसमध्ये जाऊन आपल्या नोटा बदलू शकतात. आरबीआयने म्हटले आहे की, २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर राहतील.
 
 
Powered By Sangraha 9.0